Maharashtra Thane

संपूर्ण देश कोरोना विषाणूचा सामना करीत आहे. लॉकडाऊन चा कालावधी १७ मे पर्यंत वाढविण्यात आला असून देशभरातील तसेच माझ्या ठाणे लोकसभा मतदारसंघातील भरपूर परप्रांतीय नागरिक आपल्या नातेवाईक व घरापासून दूर आहेत. यामध्ये गरीब मजूरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. आपल्या घरापासून व मूळ गावापासून दूर असल्यामुळे त्यांना या लॉकडाऊन मध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व मजुरांना आपल्या मूळ गावी जाता यावे यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार प्रयत्न करीत आहे.
माझ्या ठाणे लोकसभा मतदार संघातील मीरा भाईंदर, नवीमुंबई व ठाणे या परिसरात या मजुरांची संख्या लक्षणीय आहे. त्यांना मीरा भाईंदर, नवीमुंबई व ठाणे येथून उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान, गुजरात, उत्तराखंड, कर्नाटक, पश्चिम बंगाल व इतर राज्यांमध्ये जाण्यासाठी श्रमिक रेल्वे चालविण्यात यावी अशी मागणी पश्चिम रेल्वे चे महाव्यवस्थापक यांच्याकडे करण्यात आली. लवकरच रेल्वे विभाग संबंधित विभागांना आदेश देऊन हि रेल्वे सेवा चालू करतील अशी अशा बाळगूया.

M.P THANE.