मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे . त्यामुळे इतर राज्यातील अनेक मजूर महाराष्ट्रात अडकले . यापार्श्वभूमीवर बिहारमधील आरजेडीचे आमदार सरोज यादव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन मदतीची मागणी केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांना मदतीचं आश्वासन दिले. त्यांच्यामधील संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दोन मिनिटं २० सेकंदाची ही ऑडिओ क्लिपमध्ये आरजेडीचे आमदार सरोज यादव यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात अडकलेल्या बिहारमधील मजुरांची मदत करण्याची मागणी करत होते. “सर नमस्कार, मी बिहारमधून आरजेडीचा आमदार बोलत आहे. माझ्या शहरातील काही कामगार तुमच्या येथे दोन-तीन ठिकाणी अडकले आहेत. त्यांच्याकडे अन्नासाठी पैसेही नाहीत,” असे सरोज यादव सांगतात.

यावर उद्धव ठाकरे त्यांनी आपण चिंता करु नका असं सांगत अडकलेल्या कामगारांचा पत्ता आणि संपर्क क्रमांक लिहून घेतात जेणेकरुन त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल. सोबतच तुम्ही त्यांची अजिबात चिंता करु नका. योग्य ती मदत पोहोचवली जाईल असे आश्वासन देतात.

महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांनी फक्त आश्वासन दिलं नाही तर तू पूर्णही केली. सरोज यादव यांनी उल्लेख केलेल्या हरिवंश चौधऱी यांनी शिवसेना शाखेतील लोक आले होते. त्यांनी आम्हाला अन्न पुरवलं असू आता आमची काही तक्रार नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी दाखवलेल्या नम्रतेचे लोकांकडून कौतुक केले जात आहे.