ठाणे : आज दिनांक १४/०२/२०२० रोजी, सकाळी १०

0
101

*१४ फेब्रुवारी गोर-गरिबांसाठी रोटी डे!*

ठाणे : आज दिनांक १४/०२/२०२० रोजी, सकाळी १० ते २ वाजेपर्यंत ठाणाच्या आशापुर मंदीर, माजीवाडा ब्रिज, तीन हात नाका व इतर ठिकाणी ‛व्हॅलेंटाईन डे’ हे पुर्ण जग भरात लोक साजरा करतात त्या निमित्त गरिबांसाठी ‛रोटी डे’ च्या कार्यक्रम हेलपिंग हँडस युवा फाउंडेशन ग्रुपच्या वतीने करण्यात आला. या दिवशी गोर-गरीब लोकांना आणि मुलांना जेवण, केक, चॉकलेट, बिस्कीट आदी वस्तू वाटप करण्यात आली.

या कार्यक्रमात जेवण वाटप करण्याच्या आदी गरीब लोकांना स्वच्छताचा पाठ शिकवला आणि जेवण्या च्या आदी हात धुण्याची सवय शिकवली.

या हेल्पिंग हैंड्स युवा फाउंडेशन चे संस्थापक व अध्यक्ष आशिष अनिल उज्जैनवाला, उपाध्यक्ष भावेश भोईर, खजिनदार अंजली चौहान, मुख्य सदस्य सोहम चंदनशिवे व अण्य सदस्य उपस्तिथि होते.

या कार्यक्रम मध्ये नेशनल एन्टी करप्शन एंड आपरेशन समिति चे महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण पाटील व काही सामाजिक कार्यकर्ता उपस्थित होते .