Maharashtra

ठाणे महापालिकेच्यावतीने कोरोनाबाधित रुग्णावर तातडीने उपचार करता यावेत यासाठी ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे उभारण्यात येत असलेल्या रुग्णालयाची पाहणी आज मा. ना. श्री. एकनाथजी शिंदेसाहेब, स्वत: मी एमएमआरडीचे व्यवस्थापकीय संचालक आर.ए. राजीव यांच्यासमवेत पाहणी केली. यावेळी खासदार राजन विचारे, महापालिका आयुक्त विजय सिंघल, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या अधिष्ठात्री डॉ. प्रतिभा सावंत तसेच एमसीएचआयचे अध्यक्ष अजय आशर, राजीव वोरा ही उपस्थीत होते.
1000 बेडच्या या रुग्णालयात 80 बेडचा आय.सी.यू कक्ष, 500 बेड ऑक्सिजनयुक्त व 500 बेड ऑक्सिजनविरहीत असणार आहेत. डायलेसीस सेंटर, कोविड चाचणी प्रयोगशाळा तसेच डॉक्टरांना राहण्याची सोय करण्यात येत आहे. महापालिकेच्यावतीने बांधण्यात येत असलेल्या या रुग्णालयाचे काम प्रगतीपथावर सुरू असून 25 मे पर्यत रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. भविष्यातील या रुग्णालयाचा आराखडा कसा असेल याचे सादरीकरण यावेळी करण्यात आले असून आर.ए.राजीव यांनी या कामाचे कौतुक केले व एमएमआरडीच्या माध्यमातून देखील या रुग्णालयासाठी मदत करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच एमसीएचआयचे देखील या रुणालयासाठी सहकार्य मिळणार आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर देखील कोविड वाढलयास रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी हे रुग्णालय उभारण्यात येत आहे. या रुग्णालयासाठी नगरसेवक निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपये नगरसेवक निधी देण्यात येणार आहे. या रुग्णालयासाठी सहकार्य करणारे एमएमआरडीए, एमसीएचआय, महापालिका व नगरसेवकांचे आभार ठाण्याचा प्रथम नागरिक या नात्याने मानले तर कोरोनाचे रुद्ररूप लक्षात घेवून नागरिकांनी गांभिर्यांने पालन करावे व घरातच राहून महापालिकेस सहकार्य करावे.

नरेश गणपत म्हस्के,
महापौर, ठाणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here