ठाण्यातील पत्रकारांची कोविड 19 चाचणी, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाने मानले डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार

0
291

ठाणे (दि. 13) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने ठाण्यातील पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरामन यांची चाचणी करण्यात आली होती. या चाचणीत त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेणाऱया खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे जाहीर आभार मानले आहेत.

कोरोना विषाणूने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. असे असले तरी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरामन यांना आपला जीव धोक्यात घालून काम करावे लागते. पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाणे शहरातील पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरामन अशा 38 जाणांची तातडीने चाचणी केली होती.

या चाचणीचे आज सायंकाळी रिपोर्ट आले असून ते निगेटिव्ह आले आहेत. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या कमिटीने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व राज्याचे नगरविकास मंत्री, ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. यामध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी विशेष मेहनत घेतली.

National Anti corruption
NAC News
State Crime Reporter Maharashtra
Pravin Patil

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here