Maharashtra
!! श्री स्वामी समर्थ !!
स्वामी ओम,
म्हणतात ना *” स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी “* ही गोष्ट अश्याच एका माऊली ची की जी एक नाही दोन नाही तब्बल हजारो अनाथ आणि निराधार मुलांची *आई* आहे. सर्व त्यांना प्रेमाने *माई* म्हणतात, हो मी सिंधू ताई सपकाळ ह्यांच्या विषयी च बोलतोय, माई बद्दल किंवा त्यांचे कार्य सांगायची गरज च नाही. ज्यांना आज वर त्यांच्या निःस्वार्थ कार्या बद्दल *डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार*, *पद्मश्री पुरस्कार*, *मदर तेरेसा अवॉर्ड* व अशा बऱ्याच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
कोरोना च सावट सूरू झाल्या पासून आपल्याला आपल्या छोट्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण अवघड होत आहे तर विचार करा माईं चा परिवार कीती मोठा आहे आणि त्यांना किती समस्यांना सामोरे जावे लागतं असेल . आपण हया समाजाचे घटक आहोत तर आपली ही हया समाजाबद्दल काही कर्तव्ये आहेत ही जाण आपण ठेवायला हवी. एखादा व्यक्ती समाजा साठी चांगले काम करतो म्हणून आपण नेहमीचं त्याच्या कार्याचं कौतुक करतो पण आपण त्यांना त्याच्या कार्यात मदत ही करायला हवी .
‘सिंधुताई सपकाळ’ या माऊलीने कदाचित कधी स्वामी माउली च नाव घेतलं नसेल,जप ही केला नसेल पण स्वतःचे हात रिते असताना दुसऱ्याची ओंजळ कशी भरावी हे त्यांच्या कडून शिकण्या सारखं आहे.अशा निस्वार्थी लोकांच्या पाठी स्वामी नेहमीचं उभे असतात. ( निःस्वार्थ पणे केलेली सेवा ही स्वामी सेवाच समजावी ).
मी प्रमोद नाईक एफबी वर माझे *श्री स्वामी समर्थ क्रिएशन* नावाने पेज आहे त्यावर मी स्वामीना रोज एक स्टेटस व्हिडिओ बनवून सेवा देतो व त्यामुळें हजारो सेवेकरी माझ्या संपर्कात आले. वॉट्स ॲप ब्रॉड कास्ट लिस्ट मध्ये जवळ जवळ ३-४ हजार सेवेकरी आहेत, मागच्या वर्षी कोरोना काळात बऱ्याच सेवेकरी ना अर्थिक संकट आली त्यावेळी आम्ही प्रत्येकी कमीत कमी १०० रुपये असे गोळा करून सगळ्यांना मदतीचा हात दिला. *खर तर आम्ही सगळे निमित्त मात्र होतो करता करविता स्वामी आहेत. काही दिवसा पूर्वी माई ची पोस्ट वाचली व मनात आले की अश्या माऊली चे ऋण कसे फेडता येतील तर त्यांच्या कार्यात मदत करून त्यांना हात भार लावू शकतो. म्हणून मी हे मदतीचे आवाहन* करतं आहे, जर प्रत्येकाने आप आपल्या परीने त्यांना अर्थिक मदत केली तर खरच एक चांगले *स्वामी कार्य* आपल्या हातून घडेल. मी डोनेशन लिंक खाली देत आहे त्यावर ज्यांना ही मना पासून माई च्या कार्याला मदत करावशी वाटत असेल त्यांनी नक्की मदत करावी ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करून त्यांच्या कार्यात हात भार लावावा.
(कमीत कमी १०० रू बाकि स्व खुशीने जास्त करूं शकता डोनेशन ची रक्कम मी कमी जरी लिहिलीय तरी जितके जास्ती सेवेकरी जोडले जातील तितकी मुबलक रक्कम आपल्या सर्वान कडून माई च्या कार्याला जाईल म्हणून प्रत्येकाने ही पोस्ट जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहचवा. आपण आपलं काम करू, माई त्यांचं करतील बाकी आपल्या प्रयत्नांना यश द्यायला स्वामी तर आहेतच )
CONTACT :
Address: The Mother Global Foundation , Om Rudra Colony, Ramling road , near HP Petrol Pump , Shirur (Ghodnadi) , Tal.-Shirur, Dist.-Pune – 412 210
Mob. No- 9881337914 / 8600760014

TO CONTRIBUTE AND DONATE DETAILS ARE AS FOLLOWS
DONATE NOW :
https://www.sindhutaisapkal.org/donate

BANK DETAILS:-
BENEFICIARY NAME: THE MOTHER GLOBAL FOUNDATION
ACCNT NO: 918010082674527
IFSC CODE: UTIB0000404
BANK NAME: AXIS BANK
BANK ADDRESS: MANJARI ROAD , PUNE

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here