परराज्यात अडकलेल्या नागरिकांसाठी रेल्वेच्या विशेष गाड्या; ‘येथून’ धावणार स्पेशल ट्रेन

लॉक डाऊन लागू करण्यात आल्याने परराज्यात अडकलेल्या नागरिकांसाठी केंद्र सरकारकडून आणखी एक दिलासादायक बातमी आली आहे. केंद्राने परराज्यात अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या मूळ राज्यात पोहचवण्यासाठी रेल्वे गाड्यांचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. केंद्र सरकारने रेल्वे गाड्या सोडण्यास हिरवा कंदील दिल्यानंतर आता रेल्वे मंत्रालयाकडून देखील देशातील कोणकोणत्या ठिकाणांवरून आजपासून रेल्वे गाड्या सोडण्यात येतायेत याबाबतची माहिती दिली आहे.

रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आजपासून लिंगमपल्ली ते हतिया , अलुवा ते भुवनेश्वर, नाशिक ते लखनौ, नाशिक ते भोपाळ, जयपूर ते पटना आणि कोटा ते हतिया या रेल्वेगाड्या धावणार आहेत. या विशेष रेल्वेगाड्या परराज्यात अडकलेल्या विद्यार्थी, कामगार, यात्रेकरू यांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी जनतेशी संवाद साधताना महाराष्ट्रामध्ये अडकलेल्या परराज्यातील नागरिकांना आपल्या राज्यात परत जात असताना महाराष्ट्र सरकारच्या सर्व सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे.

Manoj Singh

Navi Mumbai Reporter