मुंबईत सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी; वांद्रे स्टेशनबाहेर परप्रांतीय मजुरांची मोठी गर्दी

0
271
मुंबईत सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी; वांद्रे स्टेशनबाहेर परप्रांतीय मजुरांची मोठी गर्दी
मुंबईत सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी; वांद्रे स्टेशनबाहेर परप्रांतीय मजुरांची मोठी गर्दी

[14/04, 7:28 pm]
Maharashtra Mumbai

 राज्यात आणि देशात लॉकडाऊन असताना मुंबईत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याची घटना समोर आली आहे. वांद्र स्टेशनबाहेर परप्रांतीय मजुरांची हजारोंची गर्दी आज दुपारी जमली होती.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली. त्यानंतर आज दुपारी वांद्रे पश्चिम परिसरात स्टेशनबाहेर मोठी गर्दी जमा झाली होती. आम्हाला आमच्या घरी सोडा अशी येथे जमलेल्या नागरिकांची, मजुरांची मागणी होती. वांद्रे रेल्वे स्टेशनच्या बाहेर जामा मशिदीच्या जवळ ही गर्दी जमली होती. याठिकाणी जमलेले जास्तीत जास्त लोक कामानिमित्त उत्तर प्रदेश आणि बिहार येथून मुंबईत आलेले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात ही गर्दी याठिकाणी कशी जमली याचा तपास पोलीस करत आहेत.

या संपूर्ण प्रकाराची मिळताच स्थानिक नेते आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांना गर्दीला समजावण्याचा प्रयत्न केला. पोलीस आणि नेत्यांच्या आवाहनानंतर काही वेळात गर्दी ओसरली. मात्र मुंबईतील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आणि अशा स्थितीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी रस्त्यावर येणे गंभीर बाब आहे.
लॉकडाऊनमुळे रेल्वेची प्रवासी वाहतूक 3 मे पर्यंत बंद आहे. राज्यांच्या सीमाही सील करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत हातात कामधंदा नसताना दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न या मजुरांपुढे आहे. त्यामुळे आज रेल्वे सुरु होतील आणि आपल्याला आपल्या गावी परतता येईल अशी आशा या मजुरांना होती. मात्र ते शक्य नसल्याचं लक्षात येताच या सर्वांना संयमाचा बांध फुटला आणि ते रस्त्यावर उतरले.

गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना सर्वांना सूचनांचा पालन करण्याचं आवाहन केले. मात्र गर्दी नियंत्रणात येत नसल्याने पोलिसांना सौम्या लाठीचार्ज करावा लागला. त्यानंतर गर्दी नियंत्रणात आली. आता परिसरातील गर्दी पांगवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.