मुंबई :- करोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सुरू

0
120

मुंबई :- करोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या लढ्याला पुरेशी मदत मिळावी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहायता निधीत मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला मोठा प्रतिसादही मिळत आहे. लहान मुलांपासून तर उद्योगपतींकडून या निधीत रुपये जमा करत आहेत. ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी लाखो रुपयांचं योगदान यासाठी दिलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधीत सुमारे १९७ कोटी रुपये जमा झाले आहेत.