Maharashtra Mumbai-
मुंबई : आज कोरोनाशी संपूर्ण जग लढत आहे. देशातील सर्वच नेते राजकारण बाजूला सारून एकत्रित कोरोनाशी लढा देत आहेत. मात्र महाराष्ट्रात काही जण राजकारण करत आहेत; पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे राजकारण न करता सर्वांशी मिळून कोरोनाशी संघर्ष करत आहेत. त्यामुळे मी गडकरींना मनापासून धन्यवाद देतो, असे उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज काढले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला असता ते बोलत होते.