Maharashtra Thane
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा गरजू नागरिकांना मदतीचा हात
*राष्ट्रीय बंजारा परिषदे* कडून ठाणे शहरात बंजारा समाजातील गरजू नागरिकांना धान्य वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात संचारबंदी असताना ठाणे शहरात लाखो बंजारा समाजातील लोकांचे हातावर पोट आहे. मात्र कोरोनामुळे सर्वत्र काम बंद असल्याने त्यांचा रोजच्या खाण्या-पिण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. समाजातील गोर – गरीब, निराधार, विधवा महिलांना रोजच्या चरितार्थाचा प्रश्न भेडसावत असल्याने गोर हृदसम्राट किसनभाऊ राठोड अध्यक्ष राष्ट्रीय बंजारा परीषद यांच्या मार्गदर्शना नुसार धान्य वाटप करण्यात आले आहे.
3 मे पर्यंतच्या लॉकडाऊनमुळे पोटाला एकवेळची भाकरी देखील मिळेना झाली आहे. नेहमीच गरिबांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या राष्ट्रीय बंजारा परिषदेने गोरगरीब व असाह्य लोकांना मदतीचा हात दिला.
*राष्ट्रीय बंजारा परिषदेचे ठाणे शहर अध्यक्ष मा.देवराज राठोड यांच्या उपस्तिथीत, ठाणेशहर, वाघबिल,पातलीपाडा ,डोंगरीपाडा ,मानपाडा ,तुळशीधाम ,तीन हाथ नाका , मुंब्रा ,व शिलफाटा तसेच अनेक ठिकाणी बंजारा समाजातील गोरगरीब लोकांना धान्य वाटप करण्यात आले*
*वाटप करत असताना श्री संतोष जाधव ,श्री शंकर नक्का ,संघटक राष्ट्रीय बंजारा परिषद यांनीही मोलाचे योगदान दिले,यांनीही दिवसरात्र परिश्रम घेतले.*
उर्वरित भागामध्ये दररोज धान्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती गोर प्रकाश राठोड, राष्ट्रीय प्रवक्ता राष्ट्रीय बंजार परीषद यांनी दिली.