Maharashtra Thane

संपूर्ण देश कोरोना विषाणूचा सामना करीत आहे. लॉकडाऊन चा कालावधी १७ मे पर्यंत वाढविण्यात आला असून देशभरातील तसेच माझ्या ठाणे लोकसभा मतदारसंघातील भरपूर श्रमिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. शासनाने महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरील श्रमिकांसाठी ट्रेन व बस सेवा सुरु केली आहे व सर्व जण त्याचा लाभ देखील घेत आहेत. पण कोंकणी चाकरमान्यांना आपल्या मूळ गावी जाण्यासाठी अद्यापही ट्रेन व बस सेवा सुरु झालेली नाही. मुंबई, ठाण्यात व इतर मोठ्या शहरात कोकणवासीयांची संख्या अधिक आहे. लॉकडाऊन होऊन आज ५० दिवस पूर्ण झाले आहेत, या चाकरमान्यांकडे असलेले पैसे व धान्य संपत आले आहे. या गोष्टीची गांभीर्याने दखल घेऊन ठाणे जिल्हाधिकारी श्री राजेश नार्वेकर यांना पत्र देऊन कोकणाकरिता बस व रेल्वे सेवा लवकरात लवकर चालू करावी हि विनंती केली. लवकरच संबंधित विभाग आदेश देऊन हि सेवा चालू करतील अशी अशा बाळगूया.

MP Rajan Vichare

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here