🇮🇳: मुंबई : कोरोना व्हायरचा फैलाव संपूर्ण जगात दिवसागणिक वाढताना दिसत आहे. अशा महामारीच्या परिस्थितीत सर्वच देश आपल्या नागरिकांना मृत्यूच्या दारातून परत आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे या आणीबाणीच्या काळात समस्त जग एकजूट होऊन एकमेकांना मदत करत आहेत. अशा सर्व परिस्थितीत भारताचे मात्र विशेष कौतुक संपूर्ण जगातून होत आहे. भारताचं कौतुक करणाऱ्या राष्ट्रांमध्ये स्वित्झर्लंड देखील पुढे आला आहे.
स्वित्झर्लंडने अनोख्या पद्धतीत भारताचे कौतुक केलं आहे. शुक्रवारी भारताच्या सन्मानार्थ लेसर लाईटच्या मदतीने मॅटरहॉर्न पर्वताला तिरंग्याच्या रंगात रंगवण्यात आहे. मॅटरहॉन डोंगर स्वित्झर्लंडमध्ये स्विस आलप्स याठिकाणी आहे. स्वित्झर्लंडमधील भारतीय दूतावासाने ट्विटरवर हे अनोखं चित्र शेअर केले आहे. कोरोना वादळ अद्यापही शमलेलं नाही. भरतात देखील कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत आहे.