Maharashtra Nashik Yevole-

इथे ओशाळली भूक….
काम- भुकेल्याला अन्न देणे,
सोसियल मीडिया फोरम, कांदा व्यापारी असोसिएशन आणि माणुसकी फाऊंडेशन.
एका सामान्य आजाराला घातक ठरवून जगाच्या अर्थव्यवस्थेच्या चिंधड्या उडवणाऱ्या चीन च्या ‘कोरोना’ या महापापी आपत्याला डोक्यावर घेऊन आपला देश जवळपास दीड महिना घरात लपून बसलाय.ज्यांच्याकडे अजून बरीच वर्षे कुटुंब चालवण्याची क्षमता आहे त्यांनी अजून दीड वर्ष तरी घरीच बसावं.कारण संकटात इतरांच्या मदतीला बाहेर पडायला हवा असणारा रक्तगट A to Z पॉझिटिव्ह लागतो
तो रक्तगट हल्ली येवल्यात अन्नदानाच्या माध्यमातून सेवा करणाऱ्या येवला नगरीचे संस्थापकाचे वंशज असणाऱ्या आमचे मार्गदर्शक असणाऱ्या बंडूनाना शिंदे आणि मित्र राहुल लोणारी,अतुल घटे,सचिन सोनवणे आणि सोबत असणाऱ्या कांदा व्यापारी असोसिएशन आणि माणुसकी फाउंडेशनचे अलकेश कासलिवाल आणि कार्यकर्त्यांचं आहे.(सगळे नाव माहीत नसल्याने माफी असावी).
नाना,लोक चांगल्या कामात,समाजसेवेत काड्या करीत असतात हे पूर्वी पासूनच चालत आले आहे याकडे लक्ष न देता आपले निस्वार्थी काम असेच चालू राहील यात शंका नाही,
न्यूज चॅनेलवर दिवसभर निगेटिव्ह बातम्या आणि सेलिब्रेटींची स्वयंपाक घर धुंडाळणाऱ्या भंकस पत्रकारितेला आणि कोणतीच उपाययोजना न करता रात्रीतून देश बंद करणाऱ्या केंद्र सरकारला चपराक देणारे हे कार्य करतायत पुढारी वर्तमानपत्राचे अभ्यासू पत्रकार आमचे मार्गदर्शक मित्र बंडूनाना शिंदे आणि त्यांना मोलाची साथ देणारे बाकीचे सर्व सदस्य,सहकारी,सामाजिक कार्यकर्ते.
पैठणी वस्त्रोद्योगामुळे देशात नावाजलेल्या येवला नगरीच्या परिसरातील भुकेल्या कुटुंबाला आणि बाहेरच्या गावी रस्त्याने जाणाऱ्या कामगारांच्या कुटुंबाला गेल्या ४५ दिवसापासून एक वेळचं जेवण देणारे येवला तालुक्यातील हे सामाजिक कार्यकर्ते पाहिले की मी ही येवलेकर असल्याने उर अभिमानाने भरून येतो.
भव्य बंगले बांधून,बायकोच्या कुशीत लपून बसलेली,जीव मुठीत घेऊन दिवसातून शंभरवेळा मूठ धुणारी,बाहेरून घरी आल्यावर प्रत्येक वेळी अंत्यविधी करून आल्याच्या मानसिकतेत दारातच कापड्यासहीत शुचिर्भूत होणारी,आपापले मोहल्ले दगडांनी अडवून सुरक्षित राहु पाहणारी सुशिक्षित(?),भित्री माणसं हल्ली कोरोनापेक्षा जास्त भयानक वाटतायत.
अशा वेळी प्लेग झालेल्या मुलाला खांद्यावर घेऊन त्याच्या उपचारासाठी पायपीट करणाऱ्या सावित्रिचा हा देश आज
एक ‘पेग’ मिळतोय का या आशेनं लॉकडाऊन संपायची वाट पाहतोय
देशात व्यवस्थाच नाही तर अर्थव्यवस्था वगैरे…
असो पुढे लिहीत नाही….
येवलेकर या नात्याने मला तुमचा सदैव अभिमान राहील👍
आपलाच-दिनेश राऊत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here