हलाखीच्या परिस्थितीत दारुड्या नवर्या सोबत संसार करत आपल्या दोन मुलांसह ती कसाबसा संसाराचा गाडा पुढे हाकत होती.

रोज सकाळी उठल्यावर नवर्याच्या डब्याची तयारी, घरातली कामं, मुलांना दुपारच्या शाळेत पोहोचवून चारघरची धुणीभांडी करुन, ती पुन्हा मुलांना शाळेतुन आणायला पोहोचायची,
तिथुन थकल्या-भागल्या अवस्थेत कशीबशी घरी पोहोचते_न_पोहोचते तोच तिच्या रात्रीच्या जेवणाची तयारी सुरु,
मग एकीकडे जेवण आणि एकीकडे मुलांचा अभ्यास ….ही दिवसभराची तारेवरची कसरत ती अगदी हसत हसत करायची

मात्र संध्याकाळी होणारी दारावरची थाप तिच्या काळजाचा ठोका वाढवायची. अगदी धडधडणार्या रेल्वेच्या रुळासारखी..

त्याचं घरी येणं म्हणजे …घरभरं पसरलेला दारुचा असह्य वास, न ऐकविणार्या शिव्या, विणाकारण होणारी मारहाण.. दिवसभर मरं-मरं कामं आणि आणि संध्याकाळी बेदम मार
हा होता तिच्या भयानक जिवनाचा न संपणारा संघर्ष

पण 20 मार्च रात्री अचानक
पंतप्रधानांनी कोरोना वायरसच्या वाढत्या धोक्याला आळा घालण्यासाठी लाॅकडाऊनची घोषणा केली.

लाॅकडाऊनमुळे कोणालाच घरातुन बाहेर पडण्याची मुभा नव्हती.
ति घरी होती आणि तो सुद्धा घरीच होता..
मुलांच्या शाळांना सुट्टी देण्यात आली होती. सर्व कंपन्या, कारखाने, कार्यालये बंद होती
आणि संसार उध्वस्त करणारी दारुची दुकाने… ती सुद्धा…..

दारु बंद असल्याने तीला थोडा धीर मिळाला होता.
एरवी दारु पिऊन शिविगाळ-मारहाण करणारा तो…
दारु न पिता मात्र एका सज्जन माणसारखा वागत होता. तिच्याशी प्रेमाने बोलत होता, मुलांबरोबर खेळत होता, गप्पागोष्टी करत होता, कुटुंबाची काळजी घेत होता. लाॅकडाऊनमुळे दिवस हलाखीचे असले तरी…
ते 45 दिवस संसार अगदी हसत खेळत चालु होता..

आणि एक दिवस अचानक
सरकारने दारुची दुकाने सुरु करण्याचे आदेश दिले.
तिच्या काळजाची धडधड पुन्हा सुरु झाली. कारण तिच्या जिवनाचा तो भयानक संघर्ष आता पुन्हा सुरु होणारं…….
पुन्हा तो घरभरं पसरलेला दारुचा असह्य वास, त्याच न ऐकविणार्या शिव्या, विणाकारण होणारी मारहाण..
कुंटुबाची होणारी..तारांबळ…. To be Continued…

ही कोणती काल्पनिक गोष्ट नाही रे…मित्रांनो…
व्यसनाधीन पुरुषांच्या घरात रोज घडणारी कौटुंबिक हिंसेची हृदयद्रावक कहाणी आहे…
किंबहुना या असह्य वेदना मी सुद्धा अनुभवल्यात लहाणपणी 😥

_____________________________________
काही दिवसांपुर्वी Domestic Voilence हे पुस्तक वाचनात आलं होतं
या पुस्तकाच्या लेखिका जे. विल्यम्स म्हणतात 👇
80% टक्के कौटुंबिक हिंसेच्या मागे दारु हेच प्रमुख कारण  आहे.
कारण नशेत मारहाण करणाऱ्‍याला, स्वतःच्या वागणुकीचा दोष दुसऱ्‍या कशावर तरी टाकण्याचे एक निमित्त सापडते.” त्या पुढे म्हणतात: “असे दिसते, की आपल्या समाजात दारूच्या नशेत बायकोला मारहाण करण्याची कल्पना पचवणे तितके कठीण जात नाही. मारहाण सहन करणारी स्त्री देखील आपल्या पतीला अत्याचार करणारा या दृष्टीने पाहण्याचे टाळून दारूडा या दृष्टीने पाहते.” अशा विचारसरणीमुळे, पत्नीच्या मनात एक आशा उत्पन्‍न होते, की “त्याने पिण्याची सवय सोडून दिली की मारहाणही आपोआपच थांबेल.”

या लाॅकडाऊनने सर्वकाही बंद केलं…
काही लोकांसाठी त्रासदायक ठरला..
तर काही लोकांसाठी तो एक आशेचा किरण ठरला..
आपल्या कुंटुंबाला व्यसनापासून वाचविण्याचा..

🙏 सरकारला हात जोडुन विनंती केवळ महसुल मिळवण्यासाठी  दारुची दुकाने सुरु करु नयेत……

✍ स्वप्नील एस. सकपाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here