#ठाणेकरांसाठी_दिलासा_दायक_बातमी

#ठाण्यात_कोरोनामुक्त_रूग्णांचे_प्रमाण_वाढले
#आजपर्यंत_६९_रुग्ण_बरे_होऊन_घरी_परतले

ठाणे:- शहरात कोरोनामुक्त रूग्णांचे प्रमाण वाढले असून आतापर्यंत जवळपास ६९ रूग्ण बरे होवून घरी परतल्याचे दिलासादायक चित्र असून,एकूण बाधित रूग्णांच्या तुलनेत हे प्रमाण २० टक्केपेक्षा जास्त आहे.
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून ठाणे शहरातही या विषाणूचा संसर्ग वाढत आहे. तथापि उपचारानंतर रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढल्यामुळे रूग्णांमध्ये दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. आज पर्यत ६९ जण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना संशयित रुग्णांच्या स्वॅब टेस्टींगसाठी वाडिया हॉस्पिटलमध्ये नवीन अत्याधुनिक लॅब सुरू करण्यात आली आहे. तसेच कोव्हीड १९ रुग्णांवर उपचार करणेसाठी सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय (२७८ खाटा) व होरॉयझन रुग्णालय (५० खाटा) कौशल्या हॅास्पीटल आणि वेदांत रुग्णालय कोव्हीड -19 रूग्णालये म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत. या व्यतिरिक्त काळसेकर रुग्णालय कोवीड-19 पॉझिटिव्ह सिमटोमॅटिक रुग्णालय म्हणून तर बेथनी रुग्णालय (५० खाटा ) हे कोमाॅरबीड (comorbid) कोरोना संशयित रुग्ण दाखल करणे व उपचार करणे यासाठी कार्यान्वित आहेत.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कोव्हिड पॉजिटिव्ह लक्षणे असणाऱ्या रुग्णांना शहरातील सफायर हॉस्पिटलसह हॉटेल लेरिडा, हॉटेल जिंजर आणि भाईंदरपाडा येथील डी बिल्डींगमध्ये डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येते.

या सर्व रुग्णालयात बाधित रुग्णांसाठी आयसोलेशनची प्रभावी यंत्रणा, योग्य उपचार पद्धती आदी उपाययोजनामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होवून बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. एकूणच ठाण्यातील परिस्थिती समाधान कारक असून जास्तीत जास्त बाधित रुग्ण बरे होत आहेत.

NAC News channel