Maharashtra Thane-
#ठाणेकर आनंदाची बातमी.
ठाणे शहरात गेल्या तीन दिवसात ९ रूग्ण कोरोनामुक्त
आजपर्यंत एकूण २२ रूग्ण कोरोनामुक्त
NAC News channel:- ठाणे शहरात गेल्या दोन ते तीन दिवसांत जवळपास ९ रूग्ण उपचारानंतर बरे झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण २२ रूग्ण बरे होवून कोरोनामुक्त झाले आहेत.
ठाणे शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना दुसऱ्या बाजुला कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णांचे प्रमाणही वाढत चालले आहे. गेल्या तीन दिवसात तब्बल ९ रूग्ण बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजपर्यंत एकूण २२ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
या सर्व रूग्णांवर फोर्टीज, कस्तुरबा गांधी रूग्णालय, जिल्हा सामान्य रूग्णालय, होरायझन हॅास्पीटल, सफायर हॅास्पीटल आदी विविध कोव्हीड रूग्णालयांमध्ये उपचार सुरू होते. या सर्व रूग्णांची १४ दिवसानंतर कोव्हीड चाचणी करण्यात आली होती. ती चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.
दरम्यान सर्व कोव्हीड रूग्णालयांमध्ये रूग्णांवर उपचार करताना कोणतीही हयगय होणार नाही याची सर्व संबंधितांनी दक्षता घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत.
NAC News channel