ठाणे जिल्हयातील प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zone) जाहीर

0
705

ठाणे जिल्हयातील प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zone) जाहीर

ठाणे (दि.19)- ठाणे जिल्हयातील सर्व 6 महानगरपालिका, 2 नगर परिषदा, 2 नगरपंचायती तसेच ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषदेने आपापल्या कार्यक्षेत्रातील कोरोना प्रादुर्भावग्रस्त व्यक्तींची वाढती संख्या विचारात घेऊन जिल्हयातील क्षेत्र सीमांकित करून प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zone) म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

दि. 17 एप्रिल 2020 च्या अधिसूचनेतील परिच्छेद क्र.3 (i) व (ii) मध्ये दिलेल्या निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

ठाणे महानगरपालिकेचे संपूर्ण क्षेत्र,
नवी मुंबई महानगरपालिकेचे संपूर्ण क्षेत्र
मिरा भाईंदर महानगरपालिकेचे संपूर्ण क्षेत्र
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे संपूर्ण क्षेत्र
उल्हासनगर महानगरपालिकेचे संपूर्ण क्षेत्र
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे संपूर्ण क्षेत्र अंबरनाथ नगरपरिषदेचे संपूर्ण क्षेत्र
कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेचे संपूर्ण क्षेत्र
शहापूर नगरपंचायतीचे संपूर्ण क्षेत्र
मुरबाड नगरपंचायतीचे संपूर्ण क्षेत्र
ठाणे जिल्हा परिषदेचे संपूर्ण क्षेत्र (ठाणे ग्रामीण )ही प्रतिबधित क्षेत्र असणार आहेत.

उपरोक्त प्रतिबंधित क्षेत्रामध्ये (Containment Zone) दि.17 एप्रिल 2020 रोजीच्या शासन लॉकडाऊन आदेशामध्ये नमूद केलेल्या सवलती लागु राहणार नाहीत. व या बाबींवर सद्यस्थितीत अंमलात असलेले प्रतिबंध लागु राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here