Maharashtra
मुंबई – कोरोनाने राज्य पोलीस दलातला रविवारी दुसरा बळी घेतला आहे. यात वाकोला पोलीस पाठोपाठ मुंबईतील ५३ वर्षीय पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेने पोलिसांमध्ये कोरोनाची दहशत वाढली आहे. राज्यभरात कर्तव्य बजावत असताना सर्वाधिक पोलीस कोरोनाच्या विळख्यात अडकत आहे. कोरोनाच्या लढाईत कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या दोन पोलिसांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर, गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली. तसेच, या पोलीस कुटुबीयांना ५० लाख रुपये देण्याची घोषणाही देशमुख यांनी केली.